आयसीएसई बोर्डाचा दहावी, बारावीचा निकाल जाहीर, पुणेकर मुस्कानची सरशी
नवी दिल्ली, दि. 30 - द काऊन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकीट एक्झामिनेशन बोर्डाच्या दहावी आणि बारावीचा निकाल सोमवारी जाहीर झाला असून त्यात पुण्यातील हचिंग्स हायस्कूलमधील मुस्कान पठाण व बंगळुरुच्या सेंट पॉल इंग्लिश स्कूलमधील अश्विन राव या दोघे देशात पहिले आले आहेत. मुस्कान आणि अश्विन यांना 99.4 टक्के गूण मिळाले आहेत. तर मुंबईतील वरळी येथील ग्रीनलॉन्स स्कूलच्या फरझान भरुचा व बंगळुरुच्या देवश्री यांचा 99.20 टक्के गुण मिळवून देशात दुसरा क्रमांक आला.
याशिवाय बारावीच्या परीक्षेत कोलकाताच्या हेरिटेज स्कूलमधील अनन्या मैती देशभरात पहिली आली. तिला 99.50 टक्के गूण मिळाले. आयसीएसईच्या बारावीच्या परिक्षेत लखनौचा आयूष श्रीवास्तव, कोलकात्याचा देवेश लखोटीया, मुंबईची रिशिता धारिवाल आणि गुडगावची किर्थना श्रीकांत हे चौघे संयुक्तपणे दुसर्या क्रमांकावर आहेत. या चौघांनाही 99.25 टक्के मिळाले आहे. सोमवारी दुपारी तीन वाजता हा निकाल जाहीर करण्यात आला.