Breaking News

बिहारमधील मद्यसाठा संपवण्यासाठी 31 जुलैपर्यंतची मुदत - सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली, दि. 30 - बिहारमधील मद्य विक्रेत्यांना गोदामातील साठा संपवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने 31 जुलैपर्यंत अतिरिक्त मुदत दिली आहे. 31 मे पर्यंत साठा  संपवण्याची अंतिम तारीख होती. मात्र आता न्यायालयाने दोन महिन्यांनी वाढवून 31 जुलै केली आहे. या संदर्भात बिहारमधील मद्य विक्रेत्यांनी न्यायालयात धाव  घेतली होती.
31 मार्च रोजी न्यायालयाने मद्य निर्मिती कंपन्यांना 31 मे पर्यंत बिहारमधील सर्व साठा संपवण्याची परवानगी दिली होती. राज्यात दारू बंदी कायदा लागू झाल्यानंतर  गोदामांत मद्याचा साठा पडून होता. त्यामुळे हा साठा संपवण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्याचे आदेश सरकारला द्यावेत, अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात  आली होती. यावर 30 मार्च रोजी कायदा मंजूर करण्यात आला असून 30 एप्रिलपर्यंत कंपन्या गोदामातून मद्य बाहेर काढण्याची मुदत देण्यात आली होती, असे  राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले. आज झालेल्या सुनावणीत कंपन्यांना दोन महिन्यांची मुदत देण्यात आली.