पालिकेची विशेष सभा रद्द करण्याची काँग्रेसची मागणी
बुलडाणा, दि. 22 - खामगाव नगर परिषदेची विशेष सभा 22 मे रोजी आयोजित करण्यात आली असून ही सभा बेकायदेशिर असल्याचा आरोप करीत काँग्रेस नगरसेवकांनी ती रद्द करण्याची मागणी केली आहे.
नगर परिषदेने 22 मे रोजी विशेष सभेचे आयोजन केले. मात्र या सभेचे सुचनापत्र सभेच्या 3 दिवसापुर्वी सर्व न. प. सदस्यांना देणे बंधनकारक असताना ते न मिळाल्याचा आरोप न. प. काँग्रेस पक्षनेता अर्चना टाले, अमेय सानंदा, प्रविण कदम, विजय वानखडे, इब्राहीम खान, सुभान खान, अ. रशीद अ. लतीफ, शितल माळवंदे, शे. रिहानाबानो शे. मेहबुब, सरस्वती खासने या नगरसेवकांनी केला आहे.
महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मधील न. प. चे कामकाज चालविणे कलम 81 मधील सभा संबंधीची तरतूद पोट कलम 4 अन्वये विशेष सभेच्या बाबतीत पूर्ण 3 दिवसांची नोटीस पालिका सदस्यांना बजाविण्यात आलीच पाहिजे. मात्र काही काँग्रेस नगरसेवकांना 20 मे पावेतो उपरोक्त सभेची सुचना प्राप्त झालेली नव्हती. त्यामुळे सदरची सभा गैरकायदेशिर ठरते. तसेच स्थायी निदेश क्र.10 नुसार अध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या सभेच्या विषयासंबंधी कर्तव्ये यामध्ये नमूद केल्याप्रमाणे अध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी उल्लंघन केले असल्याने सदरची सभा रद्द करण्याची मागणी काँग्रेस नगरसेवकांनी केली आहे.