Breaking News

वरली अड्डयावर धाड; दोघांना अटक

बुलडाणा, दि. 22 - स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नांदुरा व निमगाव येथे वरली अड्डयावर धाड टाकूण 2 जणांना अटक केली असून त्यांच्याजवळून 7 हजार रूपयाचा माल जप्त केला. बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दिनकर गोरे यांच्या नेतृत्वात पथकाने 18 मे रोजी नांदुरा येथे वरली जुगार अड्डयावर छापा मारून श्रीकांत श्रीराम ढवळे यास अटक करून त्यांच्यावळून 4885 रूपये व मटका साहित्य जप्त केले. तसेच नांदुरा पोलीस स्टेशन हद्दीतील निमगाव येथे छापा मारून सदाशिव लक्ष्मण चोपडे याच्या जवळून 1845 रूपये रोख व वरली मटक्याचे साहित्य जप्त करून त्यास अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेचे एएसआय प्रकाश राठोड, हेकॉ.राजू ठाकुर, रघुनाथ जाधव, लक्ष्मण कटक व गजानन जाधव यांनी ही कारवाई केली.