Breaking News

संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सर्वात मोठी - नवले

अकोले, दि. 04 - अभिनव मध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून 1 में रोजी  विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे,  अभिनव मध्ये हॉर्स राईडिंग  म्हणजेच घोडेस्वारीचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. त्यांचे उद्घाटन म्हणून घोडेस्वारी करत प्रवरा कॉर्नर पासून नवलेवाडी मार्गे अभिनव शिक्षण संस्था संकुल पर्यंत संचलनाचे  आयोजन करण्यात आले.
या संचलनाचे उद्घाटन अभिनव शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष विक्रम नवले, खजिनदार भाऊसाहेब नाईकवाडी यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आले. घोडेस्वार करणारे व बुलेट चालवणारे विद्यार्थी हे या संचलनाचे विशेष आकर्षण ठरले.
यानंतर संस्थेचे उपाध्यक्ष सुरेशराव कोते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आपल्या भाषणात संस्थेचे अध्यक्ष नवले यांनी महाराष्ट्र दिनाचे महत्व विशद केले. संयुक्त महाराष्ट्राचा लढा म्हणजे स्वातंत्र्या नंतरचा सर्वात मोठा लढा असल्याचे नमूद केले. शाहिरी परंपरेच्या योगदानाचे महत्व सांगून इतिहासावर प्रकाशझोत टाकला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेशराव कोते यांनी महाराष्ट्र एकसंघ रहावा. जातीभेद न करता महाराष्ट्र हां एकच धर्म मानण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचे नमूद केले. यावेळी संस्थेचे सचिव प्राचार्य रमेशचंद्र खांडगे, खजिनदार भाऊसाहेब नाईकवाडी, ल. का. नवले, जयश्री देशमुख, प्राचार्य संजय बढे, अल्फोन्सा डी, अपर्णा श्रीवास्तव, लक्ष्मीकांत आहेर, डॉ. पी. बी. कुंभार, प्रा. किरण गोंटे, प्रा. अनिल बेंद्रे, सोपान जाधव, दिलीप मंडलिक आदी उपस्थित होते.