Breaking News

कळसच्या ग्रामसभेत समिती बरखास्तीचा ठराव मंजूर

अकोले, दि. 04 - कळस बु ग्रामसभेत ग्रामपंचायत कमिटी बरखास्त करणे, तहसीलदार, मोजणी अधिकारी निलंबनचा ठराव एकमताने मंजूर करण्याचा ऐत्याहसिक निर्णय टाळ्यांचा गजरात घेण्यात आला.
कळस बुद्रुक येथे महाराष्ट्र दिनाच्या ग्रामसभा सरपंच योगिता वाकचौरे यांचे अध्यक्ष ते झाली. यावेळी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष सोन्याबापू वाकचौरे, भाजप तालुका सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, भीमाशंकर साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, सोसायटी चेअरमन विनय वाकचौरे, उपसरपंच दिलीप ढगे, ग्रामपंचायत सदस्य ईश्‍वर वाकचौरे, रावसाहेब वाकचौरे, बाळासाहेब वाकचौरे, कांचन वाकचौरे, नीलिमा गवांदे, पोलीस पाटील गोपीनाथ ढगे आदी उपस्तिथ होते.
यावेळी ग्रामपंचायतचा सर्वे नं 75  हा मालकीचे जमिनीचे मोजणी होऊन ती प्रकल्पग्रस्तांना देण्यात आली. ग्रामपंचायत ला सं.नं. च्या चोहुबाजूने अतीक्रमित जमीन दाखवली ही मोजणी चुकीचे झाल्याचा प्रश्‍न काँग्रेस पक्षचे तालुकाध्यक्ष सोन्याबापू वाकचौरे यांनी उपस्तिथ केला कळस सोसायटीचे चेअरमन विनय वाकचौरे यांनी ग्रामपंचायत मालकीची ताब्यातील जमीन वहिवाट दाखविणे साठी मोजणीचे वेळी सरपंच, उपसरपंच, अथवा सदस्य उपस्थित राहिले नाही असे सांगताच धनराज वाकचौरे, ज्ञानेश्‍वर वाकचौरे, आशिष ढगे यांनी कमिटीच्या सदस्यांना धारेवर धरले  ग्रामपंचायतची जमीन म्हणजे मालमत्ता च रक्षण करण्यात असमर्थ ठरली, कर्तव्यात कसूर करणे यामुळे ही ग्रामपंचायत सदस्य कमिटी बरखास्त करण्यात यावी असा ठराव विनय वाकचौरे यांनी मांडला. यास टाळ्यांच्या गजरात एकमताने मंजुरी देण्यात आली.
तसेच ही जमिनीची मोजणी करणेसाठी आलेले मोजणी अधिकारी भुकरमापक  यांनी ग्रामपंचायतच्या मालकीची व वाहिवाटीची जमीन दुसर्‍या व्यक्तीच्या ताब्यात दाखवून तसा चुकीचा नकाशा तयार करून शासकीय जमीन खाजगी व्यक्तीच्या मालकीची दाखवून शासकीय जमिनीची परस्पर दुसर्‍याला अतिक्रमणे करण्यास प्रोत्साहन देणे सारखे शासन विरोधी कृत्य केलेमुळे त्याचे निलंबन करण्याचा ठराव टाळ्यांचा गजरात एकमताने मंजूर करण्यात आला. यावेळी शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यात यावी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी मंजूर करण्यात याव्या, जीप शाळा मध्ये सेमी इंग्रजी सुरु ठेवण्यात यावी असेही मंजूर करण्यात आले. यावेळी ग्रामसेवक रामनाथ मालुंजकर यांनी भाग्यश्री योजनेची तर कामगार तलाठी बाजीराव गडदे यांनी ग्रामसुरक्षा दलची माहिती दिली.
डी. टी. वाकचौरे चंद्रकांत भुसारी शिवराम वाकचौरे, हृदयनाथ ढगे, धनराज सरमाडे, रामभाऊ वाकचौरे, सागर वाकचौरे, संतोष वाकचौरे, राजेंद्र गफले आदींनी चर्चेत भाग घेतला.