गुन्हेगारी जाळे मोडण्यासाठी उ.प्र.मधील कुख्यात गुंडांची अन्य तुरुंगात रवानगी
लखनौ, दि. 04 - उत्तर प्रदेशमधील विविध तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या 100 कुख्यात गुंडांची स्थानिक तुरुंगातून अन्य तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. गुंडांचे स्थानिक गुन्हेगारी जाळे मोडून काढण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या गुंडांमध्ये मुख्तार अन्सारी, मुन्ना बजरंगी, अतिक अहमद, मौलाना अनवारुल हक आदींचा समावेश आहे.
कुख्यात गुंड तुरुंगात असले तरी हत्या, अपहरण, दरोडा व खंडणी आदी गंभीर कारवाया ते तुरुंगात राहून करत असतात. एकीकडे कुख्यात गुंडांना अन्य तुरुंगात हलवण्यात आले आहेत. दुसरीकडे आग्रा, वाराणसी, बरेली येथे रुग्णालयात असणा-या मनोरुग्ण कैद्यांचीही चौकशी केली जात आहे. जे कैदी मानसिकरित्या चांगले असतील त्यांना पुन्हा तुरुंगात पाठवले जाणार आहे, असे उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (तुरुंग) जी.एल. मीणा यांनी सांगितले.
तुरुंग प्रशासनाने वाराणसी, आग्रा व बरेली या भागांतील रुग्णालयांना पत्र लिहून अशा कैद्यांच्या प्रकृतीचा अहवाल देण्यास सांगितले आहे. अशा प्रकारे रुग्णालयात भरती असणा-या एकूण 18 कैद्यांची चौकशी पूर्ण झाली आहे. या सर्व कैद्यांविरोधात अटक वॉरंट जारी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. रुग्णालयात भरती असणा-या गुंडांना अनेकदा अन्य लोक भेटतात. तुरुंगात टाकलेल्या छाप्यात गुंडांकडे सिमकार्ड, मोबाईल आदी सापडल्याचे निष्पन्न झाले आहे, असे मीणा यांनी सांगितले.