गणोरेत उद्या पासून अंबिका माता यात्रोत्सव
अकोले, दि. 09 - अकोले तालुक्यातील बहुचर्चित यात्राच्या हंगामातील शेवटची यात्रा म्हणून ओळखल्या जाणार्या गणोरे येथील ग्रामदैवत अंबिका मातेची यात्रा उद्या बुधवार दि. 10 मे पासून सुरु होत आहे. येथे पशु हत्या बंद करुन गोड नैवेद्य दाखवण्याची प्रथा सुरू केली असली तरी बाहेर गावाहुन आलेले भाविक व आपल्या घरी आलेल्या पाहुण्यासाठी बहुतेक घरी तंदुरी चा बेत असतो. त्यामुळे यात्रेत मोठ्या प्रमाणात बोकडांचा व कोंबड्या चा बळी दिला जाण्याची शक्यता आहे. यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अंबिका माता विश्वस्त व्यवस्थेने दिली.
अकोले व संगमनेर या दोन तालुक्यांच्या शिवावर अकोले तालुक्यातील गणोरे गाव आहे. विशेष म्हणजे अकोले व संगमनेर या दोन शहरापासून गणोरे गाव सारख्याच अंतरावर आहे. येथे राज्यभर प्रसिद्ध असलेल्या अंबिका मातेचे जागृत देवस्थान आहे. येथे आषाढ महिन्यातल्या प्रत्येक मंगळवारी, नवरात्र उत्सवास तसेच मे महिन्यातील बुध्द पोर्णिमेस असलेल्या यात्रेस पुणे,मुंबई व नाशिक सारख्या शहरातून मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी गर्दी करतात.
यात्राच्या हंगामातील आढळा परिसरातील अंबिका मातेची शेवटची यात्रा वैशाख पोर्णिमेस बुधवार दि. 10 मे रोजी सकाळी 8 ते 10 ते अंबिका माता मुखवटा व काठीची मिरवणुक, 10.30 ते 11 होमहवन विधी, 11 ते 11.30 आमदार वैभव पिचड यांचे हस्ते अंबिका मातेला मुखवटा चढविला जाईल. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सिताराम गायकर, आनंद दिघे ईंग्लिश मिडीयमस्कुलचे अध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, अगस्ती कारखाण्याचे संचालक सुनिल दातीर, पोनि. नंदकिशोर शेळके, भालचंद्र आंबरे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस विश्वास आरोटे, जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलास वाकचौरे, लक्ष्मण कुर्हाडे, न्या. चंद्रकांत दातीर, तान्हाजी पवार आदी उपस्थित राहणार आहेत.
तसेच रात्री 10 वाजता तकतराव रथाची मिरवणुक, यानंतर शोभेच्या दारुची अतषबाजी आणि लगेच अंजली नाशिकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार आहे.
यात्रेसाठी आलेल्या पाहुण्याच्या पाहुणचारासाठी बहुतेक घरातून तंदुरीचा बेत असतो. त्यामुळे त्यामुळे या दिवशी शेकडो बोकडाची कत्तल होण्याची शक्यता आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई भासु नये म्हणुन येथील पतसंस्थेचे वतीने ठिक ठिकाणी पिण्याच्या शुध्द पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. दोन दिवस चालणार्या यात्रेची सांगता महाराष्ट्रातील नामवंत मल्लांच्या कुस्त्याच्या हगाम्याने होणार आहे.यात्रा निर्वेध पार पडण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन गावातील शांतता आबादित ठेवावी असे आवाहन अंबिका माता विश्वस्तांनी केले आहे.