देशमुखवाडीचा पाणीप्रश्न कायमचा मिटणार - सौ. पिचड
अकोले, दि. 09 - देशमुखवाडीस पुर्ण दाबाने पाणी मिळावे म्हणून स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु झाले असुन देशमुखवाडीचा पाणी प्रश्न कायमचा मार्गी लागेल, अशी ग्वाही सरपंच हेमलताताई पिचड यांनी दिली.
देशमुखवाडीस पाणीपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. त्याप्रसंगी सौ. पिचड बोलत होत्या. नवाळी वस्ती, येलमामे वस्ती येथुन जमना टेकडीवरील जलकुंभात पाणीपुरवठा करण्यासाठी मुख्य जलवाहिनी गेलेली आहे. सदर मुख्य जलवाहिनीला अनेक नागरिकांनी नळजोडणी केल्याने जमना टेकडी जलकुंभाला पाणीपुरवठा होत नव्हता. त्याच जलकुंभातुन देशमुखवाडीस पाणीपुरवठा होत असल्याने तेथील पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. यामध्ये सौ. पिचड यांनी जातीने लक्ष घालत देशमुखवाडीचा पाणी प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी चंग बांधला. रविवारी सकाळीच जेसीबीने स्वतंत्र जलवाहिनीचे काम सुरू केले. सदर काम पुर्ण झाल्यानंतर देशमुखवाडीचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे. तसेच ओमनगर, नवाळी वस्ती, येलमामे वस्ती यांना पुर्ण दाबाने पाणी मिळणार असल्याचे सौ. पिचड यांनी सांगितले. उपसरपंच गोकुळ कानकाटे व ग्रामविकास अधिकारी नेताजी भाबड हे हेमलताताई पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली या कामाकडे लक्ष देत आहेत.