मन्याळेत शेतकर्यांचे विहिरीत उपोषण
अकोले, दि. 09 - अकोले तालुक्यातील मन्याळे गावातील शेतकरी भैरवनाथ शंकर जाधव या शेतकर्याने येथील एका पतसंस्थेकडे तारण असलेल्या जमिनीवर जप्ती येऊ नये व कर्ज माफी करावी म्हणून कोरड्या विहिरीत पाण्याची व विषारी औषधाची बाटली घेऊन सुरू केलेले उपोषण दुसर्या दिवशीही सुरूच होते.
भैरवनाथ जाधव यांची मन्याळे शिवारातील सर्वे नंबर 46/1 ही शेतजमीन त्यांनी सन 2005-2006 या वर्षात एका पतसंस्थेकडे तारण ठेऊन दीड लाख रुपये कर्ज घेतले. परंतु पावसाची अनियमितता, शेतीला पाणी वेळेवर नसल्यामुळे तसेच शेत मालाला योग्य भाजरभाव न मिळाल्याने ते कर्ज फेडू न शकल्याने थकबाकीदार झाले. मात्र संबंधित संस्थेने या जमिनीची जप्ती आदेश प्राप्त करून घेतला आहे. या जमिनीवर जप्ती आल्यास माझ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल म्हणून माझ्या कर्जाची रक्कम पूर्णतः माफ व्हावी व माझ्या जमिनीवरील जप्ती रोखली जावी अशी जाधव यांची मागणी असून त्यांनी यापूर्वी तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना वेळोवेळी निवेदन दिलेले आहे.
दरम्यान नायब तहसीलदार जे. एम. गाडे, पोलीस निरीक्षक नंदकुमार शेळके, पोलीस उपनिरीक्षक आहिरे, शिवसेनेचे युवा कार्यकर्ते सतिश भांगरे यांनी शेतकर्याच्या उपोषणस्थळी भेट देऊन जाधव यांचा मन वळविण्याचा प्रयत्न केला. परंतु जाधव यांना कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने उपोषण सुरूच ठेवले आहे. भैरवनाथ जाधव यांची प्रकृती दुसर्या दिवशीही चांगली आहे. तरीही त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क करत आहोत, अशी माहिती मन्याळे गावचे पोलीस पाटील गवारे यांनी दिली.