टाकळीभानचा शंभुमहादेवाचा यात्रोत्सव उत्साहात ,विद्युत रोशनाईने खाल्ला भाव
अहमदनगर, दि. 04 - टाकळीभान येथील ग्रामदैवत शंभुमहादेवाचा दोन दिवस सुरु असलेला यात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.मंदिर व परीसरात केलेली विद्युत रोशनाई या वर्षाचे प्रमुख आकर्षण ठरले.राज्यभरातुन आलेल्या मल्लांनी कुस्तीचा आखाडा चांगलाच गाजविला.यावर्षी याञोत्सवातील गर्दिने नवा विक्रम प्रस्थापित केला.
अक्षय तृतिये नंतर येणार्या सोमवारी टाकळीभान पंचक्रोशिचे ग्रामदैवत असलेल्या शंभुमहादेवाचा यात्रोत्सव साजरा करण्याची प्रथा रुढ आहे.दोन दिवस होणार्या या यात्रोत्सवासाठी यात्रा समिती महिनाभर तयारी करत आसते .या वर्षी मंदिर व परीसरात केलेली विद्युत रोशनाई पंचक्रोशिचे आकर्षण ठरले .अनेकांनी कौतुक केले .यंदा यात्रा समितीने मोफत लोकनाट्याचे आयोजन केले होते तमाशा रसिकांनी त्याचा मनमुराद आनंद घेतला .मंगळवारी रात्री आयोजलेल्या संगित रजनीच्या कार्यक्रमात कलाकारांनी प्रेक्षकांची भरभरुन दाद मिळवित संगीत रजनीचे सादरीकरन केले .कुस्त्याच्या हगाम्यासाठी शेजारच्या जिल्ह्यातील नामवंत मल्लांनी हजेरी लावल्याने कूस्तीचे मैदान गर्दीने फुलुन गेले होते .यात्रोत्सवासाठी पंचक्रोशितील पैपाहुण्यांनी हजेरी लावल्याने यंदाच्या यात्रोत्सवासाठी गर्दीने नवा विक्रम केला.मोठ्या प्रमाणात गर्दी होऊनही यात्रोत्सव शांततेत पार पडला.