अभिनवचा विद्यार्थी आर्यन विकास शेटेचा आमदार डॉ. तांबे, आमदार पिचड यांच्या हस्ते गौरव
अकोले, दि. 04 - अकोले येथील अभिनव शिक्षण संस्थेचा विद्यार्थी आर्यन विकास शेटे याची तिसरी स्टुडन्टस आलंपिक असोसिएशन राष्ट्रीय स्तरावर 100 मिटर धावणे स्पर्धेत लहान गटातून निवड झाल्याबद्दल कामगार दिन व महाराष्ट्र दिन एक मे रोजी अभिनव शिक्षण संस्थेत आयोजित कार्यक्रमात नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विधान परिषदेचे प्रतिनिधी आमदार डा. सुधिर तांबे, आमदार वैभव पिचड यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या प्रसंगी जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष सिताराम गायकर, अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकर नवले, पुणे येथील श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापडचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेशराव कोते, अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक कचरू पाटील शेटे, अकोले महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य खांडगे, अकोल्याचे नगराध्यक्ष अॅड. के. डी. धुमाळ, उद्योजक विकास शेटे सपत्नीक हजर होते.
