एमएचटी-सीईटी परीक्षेला जिल्ह्यात 8232 परीक्षार्थी
बुलडाणा, दि. 04 - शैक्षणिक वर्ष 2017-18 पासून शासकीय, शासन अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी विना अनुदानित महाविद्यालयांच्या अभियांत्रिकी / औषधनिर्माणशास्त्र प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेशासाठी राज्यात शासनाच्यावतीने घेण्यात येणारी एमएचटी-सीईटी 2017 गुरूवार, 11 मे 2017 रोजी आयोजित करण्यात आली आहे. परीक्षा सकाळी 9.30 ते 4.30 वाजेपर्यंत या कालावधीत घेण्यात येणार आहे. या परीक्षेला जिल्ह्यातून 8232 उमेदवार बसणार आहे. तसेच परीक्षेसाठी बुलडाणा येथील 15, खामगांव येथे 5 व शेगांव येथे 2 परीक्षा केंद्रांचे नियोजन करण्यात आले आहे.
यामध्ये बुलडाणा येथील शिवाजी विद्यालय, सुवर्ण नगर येथील परीक्षा केंद्रात 600 परीक्षार्थी, एडेड हायस्कूल चिखली रोड येथील परीक्षा केंद्रात 360, शारदा ज्ञानपीठ चिखली रोड येथील परीक्षा केंद्रात 336, रामभाऊ लिंगाडे पॉलीटेक्नीक कॉलेज चिखली रोड परीक्षा केंद्रात 384, कला महाविद्यालय हाजी मलंग दर्ग्याजवळ येथील परीक्षा केंद्रात 144, सहकार विद्या मंदीर चिखली रोड येथील परीक्षा केंद्रात 456 परीक्षार्थी, जिजामाता महाविद्यालय चिखली रोड परीक्षा केंद्रात 240, सेंट जोसेफ इंग्लीश हायस्कूल, खामगांव रोड परीक्षा केंद्रात 240, राजर्षी शाहू पॉलीटेक्नीक शाहू नगर सागवण येथे 240 परीक्षार्थी, राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय पाळणा घराजवळ, बुलडाणा येथे 432 परीक्षार्थी, डॉ. राजेंद्र गोडे कृषि महाविद्यालय येथे 144 परीक्षार्थी, उर्दू मुलींचे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 240 परीक्षार्थी, भारत विद्यालय चिखली रोड येथील परीक्षा केंद्रात 552 परीक्षार्थी, पंकज लद्धड अभियांत्रिकी महाविद्यालय परीक्षा केंद्रात 504 व प्रबोधन विद्यालय जिजामाता नगर परीक्षा केंद्रात 240 परीक्षार्थी परीक्षेस बसणार आहे.
त्याचप्रमाणे खामगांव येथील शासकीय तंत्रनिकेतन परीक्षा केंद्रात 384, ए.के नॅशनल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय - भाग 1 येथी ल परीक्षा केंद्रात 576, ए.के नॅशनल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय - भाग 2 येथी ल परीक्षा केंद्रात 552, सिद्धीविनायक तंत्रनिकेतन शेगांव रोड येथील परीक्षा केंद्रात 312, सिद्धीविनायक अभियांत्रिकी महाविद्यालय येथे 168 परीक्षार्थी परीक्षेस बसणार आहे. तसेच शेगांव येथील माऊली अभियांत्रिकी महाविद्यालय येथील परीक्षा केंद्रात 600 व श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात 576 परीक्षार्थी परीक्षेस बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षा उपकेंद्रावर कलम 144 लागू करण्यात आली आहे. परीक्षार्थी उमेदवारांना परीक्षा कक्षात सकाळी 9 वाजता प्रवेश देण्यात येणार असून परीक्षार्थींनी त्यांचेसोबत स्वत:चे आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, पॅन कार्ड किंवा चालक परवाना यापैकी एकाची छायांकित प्रत सोबत आणणे आवश्यक आहे, असे केंद्र प्रमुख तथा आरडीसी नरेंद्र टापरे यांनी कळविले आहे.