स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे कार्य राज्यात उल्लेखनीय : नीलेश राणे
रत्नागिरी, दि. 09 - रत्नागिरी जिल्ह्याबरोबरच कोकणातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात सहकार क्षेत्रात स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे कार्य उल्लेखनीय आहे, असे मत माजी खासदार नीलेश राणे यांनी व्यक्त केले. पतसंस्थेच्या निमंत्रणावरून त्यांनी पतसंस्थेला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.रत्नागिरी जिल्ह्यामध्येच नव्हे, तर महाराष्ट्रात अग्रणी सहकारी संस्था म्हणून स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्था नावारूपाला आली आहे. या संस्थेचे अध्यक्ष, तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था फेडरेशन व रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाचे अध्यक्ष तसेच रत्नागिरी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक दीपक पटवर्धन यांनी माजी खासदार नीलेश राणे यांना पतसंस्थेच्या वतीने निमंत्रित केले होते. यावेळी श्री. पटवर्धन आणि पतसंस्थेतील सर्व कर्मचार्र्यांयांनी राणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. नीलेश राणे यांना स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या ठेवी, कर्ज, गुंतवणूक, नफा आदींविषयी माहिती दिली. नीलेश राणे यांनी महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील सद्यस्थिती आणि आरबीआयच्या धोरणांबाबत चर्चा केली. सहकारी संस्थांना येणार्यात अडीअडचणी सोडविण्यात सहकार्य करू, असेही राणे यांनी श्री. पटवर्धन यांना सांगितले. रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाचीही माहिती श्री. पटवर्धन यांनी दिली.