मिशन मोड स्वरूपात वृक्षलागवडीचे काम हाती घ्यावे - सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 09 - राज्यात 1 जुलै ते 7 जुलै 2017 या वनमहोत्सवाच्या कालावधीत चार कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार असून सर्व शासकीय यंत्रणेने हे काम मिशनमोड स्वरूपात हाती घ्यावे तसेच कामाचे नियोजन व आतापर्यंत केलेले काम वन विभागाने दिलेल्या नमून्यात संकेतस्थळावर अपलोड करावे अशा सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.
आज वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी पुणे, कोकण, नागपूर आणि अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी या वृक्ष लागवडीसंदर्भाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. यावेळी वन विभागाचे सचिव विकास खारगे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
वसुंधरेचे ऋण फेडण्याची वेळ आली आहे त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन वृक्षलागवडीच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन करून श्री. मुनगंटीवार म्हणाले की, वनमहोत्सवाच्या निमित्ताने राज्यात 1 जुलै ते 7 जुलै या कालावधीत चार कोटी वृक्ष लागवड होणार आहे यामध्ये वन विभागामार्फत 2.25 कोटी, इतर शासकीय विभागांकडून 75 लाख आणि ग्रामपंचायतींकडून 1 कोटी वृक्ष लागवड होणार आहे. वृक्ष लागवडीबरोबर वृक्ष जगवण्यावर ही भर दिला जावा असे सांगून श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले की, यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत, आमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम आणि महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून ही निधी उपलब्ध होऊ शकेल. यासाठी बिहार पॅटर्नचा अवलंब करावा असेही ते म्हणाले. अनेक बँकांकडून ट्री गार्ड खरेदी करण्यासाठी त्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून पैसे मिळू शकतात, त्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.