Breaking News

आयएएस अधिका-याच्या मृत्यूप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल


लखनौ, दि. 23 : भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी (आयएएस )अनुराग तिवारी यांचा संशयास्पदरित्या झालेल्या मृत्यू प्रकरणी लखनौमधील हजरतगंज पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हजरतगंज पोलिसांनी अज्ञाताविरोधात भारतीय दंड विधान 302 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. 
उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी केंद्रीय अन्वेषण विभागावर सोपवली आहे. तिवारी यांचे भाऊ मयांक यांनी ही तक्रार नोंदवली आहे. काही दिवसांपूर्वी अनुराग तिवारी यांचा मृतदेह हजरतगंजमधील मीरा बाई या अतिथीगृहाबाहेर सापडला होता. तिवारी यांचा मृत्यू अनैसर्गिक कारणामुळे झाल्याची शक्यताही त्यावेळी पोलिसांनी वर्तवली होती. तसेच शवविच्छेदन अहवालातून अनुराग तिवारी यांचा मृत्यू श्‍वसननलिका बंद पडल्यामुळे झाल्याचे निष्पन्न झाले होते.