Breaking News

गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करा - मौलाना सय्यद मदनी

नवी दिल्ली, दि. 11 - जमायत उलमा-ए-हिंद संघटनेचे प्रमुख मौलाना सय्यद अरशद मदनी यांनी केंद्र सरकारकडे गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याची मागणी केली आहे. गोरक्षकांच्या कारवायांमुळे होणा-या हिंसक घटनांच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी ही मागणी केली. पंतप्रधान मोदी यांनी गोरक्षक असल्याचे सांगत अपराध करणा-यांना शिक्षा देणार असल्याचे म्हटले होते. त्याचे स्मरण मौलाना मदीन यांनी यावेळी करून दिले .
मौलाना मदनी यांनी पत्रकार परिषदेत ही मागणी केली. सरकारने गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करायला हवे. तसा निर्णय सरकारने घेतल्यास आम्ही या निर्णयाला पाठिंबा देऊ असे ते म्हणाले. आम्ही हिंदू बांधवांच्या धार्मिक भावनांचा आदर करतो. मात्र, कोणीही कायदा हातात घेऊ नये, असे ही ते म्हणाले. गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित केल्यास सध्या असलेले भ्रम दूर होतील व अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले ही बंद होतील, असेही ते यावेळी म्हणाले.