Breaking News

अमेरिकेनंतर लासलगावमधून ऑस्ट्रेलियाला आंबे रवाना

लासलगाव, दि. 11 - दरवर्षी प्रमाणे आंब्याची निर्यात मार्गे सुरु झालेली आहे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीने अवघ्या जगावर अधिराज्य गाजवणार्या आंब्याची युरोप, अमेरिका नंतर आता ऑस्ट्रेलियाला सुद्धा वारी सुरू झाली आहे. देशातील पहिली आंब्याची कंसायमेंट वर लासलगाव येथून प्रक्रिया होऊन ऑस्ट्रेलिया साठी रवाना करण्यात आलेली आहे.
या पहिल्या कंसायमेंट मधून 1224 किलो केशर आंबे हे लासलगाव येथील भाभा अणु संशोधन केंद्रातून प्रक्रिया होऊन मुंबई मार्गे ऑस्ट्रेलिया साठी रवाना करण्यात आला. 408 बॉक्सेस मध्ये हे केशर आंबे असून एका बॉक्स मध्ये तीन किलो आंबे आहे. भारतीय आंबे हे चविष्ट असल्याने ऑस्ट्रेलिया मध्ये ही मागणी मिळत असल्याने जून अखेर पर्यंत 100 टन आंबा हा निर्यात होण्याची शक्यता आहे.
लासलगाव येथील भाभा धन केंद्रातून आंब्यावर प्रक्रिया करून अमेरिकामध्ये गेल्या काही वर्षपासून आंबा निर्यात करण्यात येत असून आता ऑस्ट्रेलियन मार्केट मध्ये आंबा निर्यात झालेला आहे.दरवर्षी साधारणत 1 एप्रिल ते 30 जून या कालावधीत लासलगावच्या या केंद्रात विकिरण प्रक्रिया केली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून पणन मंडळाच्या माध्यमातून ही सर्व विकिरण प्रक्रिया पार पाडली जात होती.मागील दोन वर्षांपासून भाभा अणु संशोधन केंद्राशी केलेला करार संपुष्टात आल्यामुळे हा प्रकल्प मुंबईच्या अँग्रो सर्च या कंपनीने भाडेतत्त्वावर घेतला आहे. लासलगाव येथे 31 ऑक्टोंबर 2002 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या लासलगाव येथील कृषी उत्पादन संशोधन केंद्र येथे हा प्रकल्प कांद्यासाठी तयार करण्यात आला होता. मात्र, येथे आता फक्त आंब्यावर विकिरण करून तो निर्यात केला जात आहे. अमेरिकेला जाणार्‍या आंब्यामध्ये हापूस, केशर, दशरा, बेंगणपल्ली, लंगडा या प्रमुख जातींचा समावेश आहे.