Breaking News

सहारनपुरमध्ये झालेल्या हिंसाचाराप्रकरणी योगी सरकारची कडक कारवाई; दोन पोलीस अधिकार्‍यांचे निलंबन

लखनौ, दि. 11 - सहारनपुरमध्ये मंगळवारी झालेल्या हिंसाचाराप्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोला-यांविरोधात कडक कारवाई केली आहे. याप्रकरणी  पोलीस महासंचालक सुलखान सिंग आणि गृहसचिव देवाशीष पांडा यांना समन्स बजावण्यात आला आहे. तर, दोन वरिष्ठ पोलीस अधीक्षकांचे निलंबन करण्यात आले  आहे.
मंगळवारी येथे झालेल्या हिंसाचारात जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आली. दलित-ठाकुर यांमध्ये झालेल्या संघर्षामुळे हा हिंसाचार झाला होता. यात दलितांनी  पोलिसांवर दगडफेक आणि गोळीबार केला. या घटनेत 12 वाहने जळून खाक झाली. तसेच एका पत्रकारालाही मारहाण करण्यात आली. यात पत्रकार जखमी झाला  होता. तसेच एक खाजगी बस आणि पोलीस ठाण्यालाही आग लावण्यात आली.