Breaking News

ग्रामस्थांनी लोकवर्गणीतुन अडीच हजार ट्रॉली गाळ काढला

औरंगाबाद, दि. 30 - औरंगाबाद तालुक्यातील जोगवाडा येथील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून पाझर तलावातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. गेल्या 19  दिवसांपासून हे काम सुरू असून, आतापर्यंत अडीच हजार ट्रॉली गाळ काढण्यात आला आहे. हा गाळ परिसरातील शेतकर्यांना मोफत दिला जात आहे.
जोगवाडा हे अवघ्या 150 कुंटुब वस्तीचे गाव आहे. गाव परिसरात जुना पाझर तलाव असून, यात कचरा, गाळ साचला होता. त्यामुळे प्रदूषणही वाढले होते. ही बाब  लक्षात घेऊन गाळमुक्त तलाव करण्यासाठी येथील ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. लोकवर्गणीतून एक लाख रुपये जमा केले. त्यांच्या या कामात महात्मा फुले ग्रामविकास  संस्थेनेही मदतीचा हात पुढे करून तीन लाखांची मदत केली. त्यानंतर 8 मेपासून गाळ काढण्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी  अधिकारी मधुकर अर्दड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकरी सुरेश बेदमुथा यांच्यासह अन्य अधिकार्यांनी गुरुवारी जोगवाडा येथे भेट देत लोकवर्गणीतून सुरू  असलेल्या या कामाची पाहणी करत ग्रामस्थांनी हाती घेतलेल्या कामाचे कौतुक केले.