Breaking News

गावकर्‍यांच्या श्रमदानाला भारतीय जैन संघटनेची साथ

औरंगाबाद, दि. 30 - आमीर खान यांच्या पाणी फाऊंडेशनने राज्यात घेतलेल्या वाटरकप स्पर्धेत सहभागी झालेल्या देण्यासाठी भारतीय जैन संघटनेने 271 जेसीबी  आणि 219 पोकलेन उपलब्ध करून दिली. या माध्यमातून राज्यातील 30 तालुक्यातील जवळपास 336 गावांमध्ये जलसंधारणाचे मोठया प्रमाणात काम झाले आहे.  वरूणराजा बरसल्यानंतर ही गावे जलयुक्त होतील असा विश्‍वास राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पारख यांनी रविवारी पत्रपरिषदेत व्यक्त केला.
प्रफुल्ल पारख म्हणाले, श्रमदानाच्या माध्यमातून ग्रामस्थांनी या गावांमध्ये कामे सुरू केली. मात्र जिथे मशिनशिवाय कामे होणे शक्य नाही अशाच ठिकाणी संघटनेने  मशिन उपलब्ध करून दिल्या. हे देताना लोकसहभागातून त्यात डिझेलची व्यवस्था करण्याचेही सांगण्यात आले होते. मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील  खुलताबाद तालुक्यातील 10 गावांना 5 जेसीबी, 16 पोकलेन, तर फुलंब्री तालुक्यातील 13 गावांना 10 जेसीबी, 7 पोकलेन उपलब्ध करून देण्यात आले.काही  ठिकाणी चांगले श्रमदान दिसून आले, मात्र लोकसहभागातून डिझेलची रक्कम उभारली आहे अशा जाफ्राबादवाडी, चिंचोली बु. या गावांमघ्ये मशिनद्वारे करण्यात  आलेल्या कामांसाठीचे डिझेलही संघटनेने दिले. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील 26 गावांमध्ये जेसीबी आणि पोकलेन मिळून 52, लातूर जिल्ह्यातील 32 गावांना  55, उस्मानाबाद जिल्ह्यातील 16 गावांना 33 मशिन उपलब्ध करून देण्यात आल्या. 8 एप्रिल ते 22 मे या 45 दिवसांच्या दरम्यान ग्रामस्थांनी लोकसहभागातून  मोठया प्रमाणात जलसंधारणाची कामे केली. त्यांना मशिन उपलब्ध करून देत संघटनेने साथ दिली.