भारतीयांच्या कार्यशैलीत होत आहेत सकारात्मक बदल : पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली, दि. 11 - भारताची येणारी पिढी देशाला विकासाच्या वेगळ्याच स्तरावर घेऊन जाईल. भारतीय नागरिक आता बदलू लागले आहेत व त्यांच्या कार्यशैलीतही सकारात्मक बदल होऊ लागले आहेत, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांची प्रशंसा केली. सर्वोच्च न्यायालयाकडून दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
सर्वोच्च न्यायालयाबाबत बोलताना ते म्हणाले की, मला आनंद आहे की सर्वोच्च न्यायालयही डिजिटल होत आहे. न्यायालयाने आधुनिकतेकडे पाऊल टाकायला सुरूवात केली असून बरेच सकारात्म बदल झाले आहेत. ऑनलाईन पद्धतीने याचिका दाखाच्या प्रक्रियेस लवकरच सुरूवात होईल, असे ते म्हणाले. याशिवाय गरीब नागरिकांचे खटले मोफत चालवून देश सेवेत योगदान देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एस.जी. खेहर यांच्याशी मागील भेटीदरम्यान न्यायालयातील प्रलंबित खटल्यांची संख्या कमी करण्यासाठी काय करू शकतो, याबाबत चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.
लोक आता नविन तंत्रज्ञनाचा अधिक वापर करू लागले आहेत. रोखविरहीत व्यवहारातही वाढ होत असल्याचे ते म्हणाले.यावेळी फॉरेंसिक तज्ज्ञांचे कौतुक करताना ते म्हणाले की, फॉरेंसिक तज्ज्ञांमुळे गुन्हेगारांचा तपास लावण्यात मदत होते. आजची तरूणाई तंत्रज्ञानाच्या वापराबाबत अधिक पुढारलेली असून त्यांच्यामुळेच आयटीची नवीन व्याख्या भारता समजली आहे. आयटी+ आयटी= आयटी होते, याचा अर्थ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी+इंडियन टॅलेंट= इंडिया टुमारो असा असल्याचे ते यावेळी म्हणले.जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात ई-गव्हर्न्सचा वापर व्हायला हवा, असे सांगत त्यांनी नागरिकांना डिजिटल करन्सी जीवनाचा भाग बनवा असे आवाहन केले. केवळ काही जणांनी याचे आचरण करून चालणार नाही. मोठ्या प्रमाणावर लोकांनी डिजिटल करन्सीचा वापर केला तरच बदल होईल, असेही ते म्हणाले. कुठलाही बदल स्विकारण्यासाठी मन बदलणे आवश्यक आहे. त्यामुळे मन बदलले तरच बदल घडून येईल, असेही ते म्हणाले.