Breaking News

मतदान यंत्राबाबतचे संशयाचे वातावरण दूर करा; काँग्रेसचे मागणी

नवी दिल्ली, दि. 11 - मतदान यंत्रांतील विश्‍वासार्हतेबाबत उपस्थित केलेले प्रश्‍नचिन्ह अत्याधुनिक तंत्रज्ञान अवगत असलेल्यांना बोलावून त्यातील तथ्य समोर  आणावे आणि संशय दूर करावा, अशी विनंती काँग्रेसचे नेते तहसीन पूनावाला यांनी निवडणूक आयोगाला केली आहे. आज येथे एका पत्रकार परिषदेत पूनावाला  बोलत होते. 
दिल्ली विधानसभेच्या विशेष अधिवेशनात आपचे आ. सौरभ भारद्वाज यांनी मतदान यंत्रात सहज फेरफार करता येतात याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. त्यानंतर आम्ही  तीन दिवसांत दिल्लीत कुठेही मतदान यंत्र हॅक करून दाखवू शकतो, असा दावा दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला.
दरम्यान निवडणूक आयोगाने सर्व आरोप फेटाळून लावत निवडणुकीत वापरण्यात आलेले आयोगाकडील कोणतेही यंत्र घेऊन जावे आणि त्यात फेरफार करून  दाखवावे, असे खुले आव्हान दिले. त्यावर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही यंत्र उपलब्ध करून देण्याचे आव्हान स्विकारले.