Breaking News

भारताविरोधात दहशतवादी कारवायांसाठी पाककडून तालिबानचा वापर - अमेरिका

वॉशिंग्टन, दि. 03 - भारत आणि अफगाणिस्तानमध्ये दहशतवादी कारवायांकरीता पाकिस्तान हक्कानी नेटवर्क आणि तालिबान या दहशतवादी संघटनेचा वापर करत आहे, असे अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण धोरण केंद्राचे संचालक सेथ जोन्स यांनी म्हटले आहे. जम्मू - काश्मीर आणि अफगाणिस्तानमध्ये आपले परराष्ट्र धोरण वाढवण्याच्या हेतूने पाकिस्तान हक्कानी नेटवर्क आणि तालिबान या सारख्या दहशतवादी संघटनेला मदत करत असल्याचेही जोन्स यांनी नमूद केले.
भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशातील संबंध चांगले आहेत. पाकिस्तान भारताला शत्रू देश समजून भारताविरोधात दहशतवादी कारवायांसाठी तालिबान या दहशतवादी संघटनेचा वापर करत असल्याचेही ते म्हणाले.