Breaking News

पाकवर दबाव आणण्याची अमेरिकेतील अफगाणी नागरिकांची मागणी

वॉशिंग्टन, दि. 03 - अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटनांना पाकिस्तानकडून मिळणारे समर्थन थांबवण्यासाठी दबाव टाकण्याची मागणी अमेरिकेतील अफगाणि नागरिकांनी अमेरिकन प्रशासन व आंतरराष्ट्रीय समुदायाकडे केली आहे. येथील अफगाणी नागरिकांनी वॉशिंग्टनमध्ये पाकिस्तानविरोधात मोर्चा काढला व बल्ख प्रातांत नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या अफगाणी सुरक्षा दलाच्या जवानांना श्रद्धांजली वाहिली.
अफगाणि अमेरिकन नागरिकांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले की, जगभरातील अफगाणि नागरिक आपल्या मायभूमीत होत असलेल्या हिंसक घटनांचा निषेध करत आहेत. आम्ही अमेरिका व आंतरराष्ट्रीय समुदायास आवाहन करत आहोत की, अफगाणिस्तानमधील दहशतवादी संघटनांना पाक पाठिंबा देत असून ते थांबवण्यासाठी पाकवर दबाव आणावा. जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी अफगाणिस्तानात शांतता नांदणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.