मेहेकर एज्युकेशन सोसायटीच्या फार्मसी कॉलेजला मान्यता
बुलडाणा, दि. 11 - स्थानिक मे.ए.सो.विदर्भातील शैक्षणिक क्षेत्रात अत्यंत नामांकित सांस्था असुन 1935 पासुन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न आहे. मेहकर एज्युकेशन सोसायटीने के.जी ते पी.जी पर्यत शिक्षणाची व्यवस्था करून व्यवसायीक व तांत्रीक शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. या वर्षीपासुन शैक्षणिक सत्र 2017-18 मध्ये संस्थेला फार्मसी कॉलेजची मान्यता मिळाली आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परीषद (ए.आय.सी.टी.ई) नवी दिल्ली यांनी नुकतीच फार्मसी कॉलेजला मान्यता दिली आहे. आतापर्यंत स्थानिक मध्यवती मेहकर मध्ये या प्रकारची सुविधा उपलब्ध नव्हती. मे.ए.सो फार्मसी कॉलेजला मान्यता मिळाल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची सोय झाली आहे.
