कोणतेही काम मन लावून केल्यास हवे ते फळ मिळते-शहापूरवाला
संगमनेर, दि. 11 - महिषासुर, रक्तबीज, शुंभ-निशुंभ यांसारख्या बलाढ्य राक्षसांना मारण्यासाठी देवीने उग्र रूप धारण केले आणि भक्तांचं रक्षण करून माता हे नांव सार्थ केले, तसेच सावित्रीबाई फुले, जिजामाता, राणी लक्ष्मीबाई अशा अनेक स्त्रियांनी कष्ट सोसून प्रतिकुल परिस्थितीवर मात करून समाजाच्या कल्याणासाठी कामे केलेली आहेत, अशा अनेक दुर्गेरूपी स्त्रियांचे कार्य स्फूर्तिप्रद आहे.
अशा नवदूर्गांच्या कार्याची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी, समाजातील स्त्रियांच्या अस्तित्वाची दाणी व्हावी, त्याचा गौरव व्हावा या उद्देशाने शाळेने यावर्षिक स्नेहसंमेलनात आदिशक्ती, स्त्रीशक्ती हा विषय केंद्रस्थानी ठेवून त्याप्रमाणे गाण्यांची निवड करून विद्यार्थ्यांनी विविध नृत्य सादर केली. नियमित अभ्यासक्रमांबरोबरच शालेय विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना प्रेरणा देण्यासाठी दरवर्षी स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येते.
मुलीचा जन्म झाल्यावरच आनंद व्यक्त करणारे, शिक्षणाची प्रचंड ओढ असणारी, अल्लडवयात फुलपाखरासारखा मुक्त संचार करावी वाटणारी, अत्याचाराविरूद्ध लढा देणारी, वृद्धा वस्थेत तुमचा मी आधार आहे. असे आत्मविश्वासाने सांगणारी, नवीन संसाराची स्वप्ने रंगविणारी अशा प्रकारे स्त्रियांचे विविध पैलू व्यक्त करणार्या गाण्यांवर आकर्षक वेशभुषेच विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. मनोरंजनाबरोबरच स्त्रिश्क्तीचा गौरव हे या स्नेहसंमेलनाचे वैशिष्ट्ये ठरले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ढोल व तबलावादनाने सारे वातावरण भारावून गेले. विद्यार्थ्यांनी सादर केलेले महिषासुर मर्दिनीची विविध रूपे विशेष आकर्षण ठरली, ढोल पथकाच्या सादरीकरणार कु.सुकृता थोरात यांनी सादर केलेल्या झाशीच्या राणीच्या भूमिकेने सारा परिसार रोमांचित झाला.
मस्तंग सॉक्य, मुंबईचे अध्यक्ष कार्यरत असलेल्या सन्माननिय अतिथी नाझनीन कात्रक व प्रमुख पाहुण्या म्हणून लुबियाना शहापूरवाला उपस्थित होते. आपले मनोगत व्यक्त करतांना त्या म्हणाल्या की, कोणतेही चांगले काम करतांना ते झोकून देऊन, मन लावून, आनंदाने केले तरच हवे ते फळ मिळेल आणि त्यामुळे आपण कोणत्याही क्षेत्रात सहज यश प्राप्त करू शकतो. दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, सुसंस्कारित भावी पिढी धडविण्यासचे काम ही संस्था करत आहे. आपला देश महासत्ता बनविण्यासाठी हे अतिशय महत्त्वाचे आहे. तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करण्याचा मानस प्रत्येकाने करायला हवा. अधिकाधिक झाडे लावली तरच संगमनेर शहर स्वच्छ व सुंदर होईल. सुक्या कचर्यापासून परसबाग फुलविण्याचा प्रयत्न करावा. माझ्या दुर्गा या नावाला साजेसा हा पुरस्कार दिल्याने मला अधिक शक्ती प्राप्त झाली आणि त्यामुळे मी अधिक जोमाने या शहरासाठी काम शकेल.
मा.सौ.दुर्गाताई तांबे, घरगुती कचर्यापासून खत निर्माण प्रकल्पाच्या मा.सौ.मंजु नावंदर, मा.सौ.किरण झंवर, नुकत्याच न्यायाधीश म्हणून निवड झालेल्या मा.कु.प्राती गोसावी, शिक्षण क्षेत्रात मोलाचे काम करणार्या मा.सौ.सिमा गोसावी, मा.सौ.राजृलबा शहा यांना आदिशक्ती सन्मानपत्र देवून पुरस्कृत केले गेले.
या कार्यक्रमाला संस्थेच्या अध्यक्षा मा.सौ.स्वाती शहा, खजिनदार मा.श्री.समिर शाह, प्रा.मा.सौ.आरती सप्रा, सौ.दिपाली चंडक, उपप्राचार्य मा.सौ.ज्योतिर्मया चव्हाण, प्रि.प्रा.प्रमुख मा.सौ.वैशाली यंदे उपस्थित होते. तसेच पालकवर्ग, प्रतिष्ठान मान्यवर, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मा.सौ.आशालता दातीर यांनी प्रास्तविक केले तर सुत्रसंचलन मा.सौ.ज्योतिर्मय चव्हाण व मा.सौ.वैशाली देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.