लग्नाच्या फटाक्यामुळे शेतकर्यांचा उस जळाला
औरंगाबाद, दि. 30 - लग्न लागल्यानंतर उडवलेल्या फटाक्यामुळे आग लागून गट क्रमांक 207 मधील गणेस रामराव राजापुरे यांचा अर्धा एकर ऊस जळाला. हा प्रकार कन्नड-औरंगाबाद रस्त्यावरील गजानन हेरिटेज येथील मंगल कार्यालयाशेजारी घडला.
कन्नड येथील पेट्रोल पंपाशेजारी गजानन हेरिटेज येथे भोसले व देशमुख परिवारचा विवाह सोहळा शनिवारी दुपारी पार पडला. लग्न लागत असताना दुपारी अडीच्या सुमारास वर्हाडी मंडळीनी फटाक्याची अतिषबाजी केली. त्यावेळी उडालेल्या ठिणग्या शेजारीच असलेल्या गणेश राजापुरे यांच्या उसात पडल्या. उन्हाळा असल्याने अगोदरच पाण्याची कमतरता आणि ऊस वाळलेला असल्याने ठिणगीमुळे आग भडकली गेली. बारामतीअॅग्रो लिमिटेडच्या (कन्नड शुगर युनिट) अग्निशमन बंब घटनास्थळी आला. बंबावरील कर्मचारी उत्तम जाधव, सुनील शेजवळ, लक्ष्मण बल्हाळ आणि सचिन राठोड यांनी दीड तास परिश्रम करून आग आटोक्यातआणली. या आगीत शेतकर्याचे सुमारे सहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.