Breaking News

जिल्ह्यात वीर सावरकर व महाराणा प्रताप सिंह यांना अभिवादन

जळगाव, दि. 30 - शहरातील विविध सेवाभावी संस्था आणि राजकीय पक्षांतर्फे वीर सावरकर आणि महाराणा प्रताप सिंह यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात  आली. जयंतीनिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महापालिकेच्यावतीने वीर सावरकर जयंतीनिमित्त सावरकर यांच्या पुतळ्यास  महापौर नितीन लढ्ढा यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी आ.राजुमामा भोळे, आयुक्त जीवन सोनवणे, स्थायी समिती सभापती वर्षा खडके, भाजपा  विरोधी पक्षनेते वामनराव खडके, भाजपाचे गटनेते सुनील माळी आदी उपस्थित होते.
तसेच शहरातील बहिणाबाई उद्यानाजवळील क्रांतिसूर्य महाराणा प्रताप सिंह यांच्या पुतळ्यास महापौर नितीन लढ्ढा यांच्या हस्ते माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात  आले. याप्रसंगी स्थायी सभापती वर्षा खडके, आयुक्त जीवन सोनवणे, सुनील माळी, चंद्रकांत वांद्रे आदी उपस्थित होते. तसेच महाराणा प्रताप यांच्या अश्‍वारुढ  पुतळ्यास विविध सेवाभावी संघटनांच्यावतीने व राजपूत समाजातर्फे विविध मान्यवरांनी माल्यार्पण करुन अभिवादन केले. जयंतीनिमित्त शहरात अनेक ठिकाणी  कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
हिंदू महासभेतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातून विशाल मशाल रॅली काढण्यात आली. रॅलीत सावरकरांनी केलेल्या कार्याचा चित्ररथ देखावा  सादर करण्यात आला होता. सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन संजय ढेकळे यांच्या हस्ते करण्यात आले. भगवे ध्वज लावून देशभक्ती गीत, लाउडस्पीकरच्या माध्यमातून  वाजविण्यात आले. मशाल रॅली शास्त्री टॉवर चौक, नेहरु चौक, शिवाजी पुतळा, नवीन बसस्थानकमार्गे रॅलीचा समारोप स्वातंत्र्य चौकात झाला. याप्रसंगी शिवराम  पाटील, विजय पाटील, वर्षा तिवारी, राजेंद्र पवार, अशोक माने, संजय ओतारी, उदय तिवारी, प्रशांत भडंगर, रुपेश अग्रवाल, नंदू जोशी, सुनील जोशी, नारायण  अग्रवाल, विनोद गवांदे, डॉ.अतुल पाटील, अँड़ अनिल पाटील, अप्पा सोनार, जनार्दन लाड, विकास पाटील, रायबा जोशी, तुषार सुर्यवंशी, सिंधू भडंगर, चंद्रकला  पाटील, सुमन सुशिर, कुसुम पाटील, मालती जोशी तसेच सदाशिव ढेकळे, अँड़ एल.व्ही. वाणी, अँड़ गोविंद तिवारी, डॉ.अतुल पाटील आदी उपस्थित होते.