Breaking News

ऑस्ट्रेलियामध्ये वर्णद्वेषामुळे पुन्हा एकदा भारतीयावर हल्ला



नवी दिल्ली, दि. 23 : ऑस्ट्रेलियामध्ये आज पुन्हा एकदा वर्णद्वेषातून एका भारतीयावर हल्ला करण्यात आला. हा भारतीय नागरिक ऑस्ट्रेलियामध्ये कॅबचालक म्हणून कार्यरत होती.ये बसलेल्या एका ऑस्ट्रेलियन जोडप्याने या चालकाला अपशब्द वापरुन बेदम मारहाण केली. या हल्ल्यात तो जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात लक्ष दिले नाही. तसेच त्यांनी अद्याप यासंदर्भात तक्रार दाखल केली नाही, असा आरोप चालकाने केला आहे. या चालकाने आपले नाव गुप्त ठेवण्यास सांगितले असल्याचे सांगण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियातील तस्मानिया येथील मॅकडोनल्डपाशी एक जोडपे रात्री साडेदहाच्या सुमारास कॅबमध्ये बसले. त्यानंतर ती महिला वारंवार गाडीची काच उघडत होती. यामुळे अपघात होवू शकतो असे चालकाने तिला,गितले. चालक वारंवार सूचना देत असल्याच्या कारणावरुन तीने चालकाला भारतीय असण्यावरुन अपशब्द वापरण्यास सुरुवात केली असल्याचे चालकाने सांगितले. त्यानंतर त्याला मारहाण करण्यात आली.