एकाच्या बदल्यात तीन पाकिस्तानी सैनिकांचे शिरच्छेद करा - कॅ. अमरिंदर सिंग
नवी दिल्ली, दि. 05 - एका सैनिकाच्या बदल्यात भारतीय जवानांनी तीन पाकिस्तानी सैनिकांचे शिरच्छेद करावेत , असे वक्तव्य पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केले. देशाला पूर्णवेळ देणा-या संरक्षण मंत्र्यांची गरज आहे. पाकिस्तानने दोन भारतीय शहीद जवानांच्या मृतदेहांची विटंबना केल्याच्या पार्श्वभूमीवर सिंग बोलत होते.
आता पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेण्याची गरज आहे. पाकिस्तानी सैन्याने एका जवानाचे शिरच्छेद केल्यास भारतीय जवानांनी त्या बदल्यात तीन पाकिस्तानी सैनिकांचे शिरच्छेद केले पाहिजे, असेही ते म्हणाले.
आता पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेण्याची गरज आहे. पाकिस्तानी सैन्याने एका जवानाचे शिरच्छेद केल्यास भारतीय जवानांनी त्या बदल्यात तीन पाकिस्तानी सैनिकांचे शिरच्छेद केले पाहिजे, असेही ते म्हणाले.