Breaking News

पठाणकोटमध्ये आढळल्या दोन संशयास्पद बॅगा

नवी दिल्ली, दि. 05 - पंजाबमधील पठाणकोटमध्ये दोन संशयास्पद बॅग्यचे वृत्त आहे. या घटनेनंतर संपूर्ण भागात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आल्याची  मिळत आहे. यासंबंधित माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी रवाना झाले असून पोलिसांनी त्या बॅगेतून मोबाईल टॉवरची बॅटरी जप्त केली. गुरूदासपूर जिल्ह्यात  एक संशयास्पद चारचाकी आढळून आली असून ती चारचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली. यानंतर पोलिसांनी या भागात शोध मोहिम सुरू केली. या प्रकरणी अद्याप  कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.