राष्ट्रपती निवडणुकीसाठी तेलंगणा राष्ट्रीय समितीचा भाजपला पाठिंबा
अमरावती, दि. 05 - राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीत तेलंगणा राष्ट्रीय समिती भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
तेलंगणामध्ये काही कल्याणकारी योजना राबवण्यासाठी केंद्र सरकारकडून आर्थिक सहाय्य मिळाले नाही, तर केंद्र सरकारच्याविरोधात जाण्याचा इशारा तेलंगणा राष्ट्रीय समितीकडून देण्यात आला आहे. एकमेका सहाय्य करू, या प्रमाणे केंद्र सरकारने आम्हाला मदत केली तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ, असे तेलंगणा राष्ट्रीय समितीचे खासदार जितेंदर रेड्डी यांनी सांगितले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ जुलैमध्ये समाप्त होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी, तर द्रमुकचे अध्यक्ष एम.के. स्टॅलिन यांची भेट घेणार आहेत.