लातूर शहरातील डॉक्टरांसाठी योग शिबिराचे आयोजन
लातूर, दि. 11 - इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने लातूर शहरातील डॉक्टरांसाठी 10 मे ते 17 मे 2017 या कालावधीत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा शुभारंभ जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांच्या हस्ते करण्यात आला.
शहरातील टिळकनगर भागात असलेल्या ग्रीन बेल्टच्या सभागृहात हे शिबीर सुरु असून 06 ते 07 या वेळेत योगासनांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रत्येकाने आपले आरोग्य चांगले सांभाळले पाहिजे. आजच्या धावपळीच्या युगात, बदलत्या जीवनशैलीमुळे तसेच फास्ट फूड खाण्यामुळे आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. योगा केल्यामुळे शरिर, आत्मा आणि श्वसनक्रिया व्यवस्थित होते. योगामुळे मनावरील ताण कमी होण्यास मदत होते. समाजाचे आरोग्य सांभाळून समाजाला दिशा देणार्या डॉक्टरांनी नियमितपणे योगासने करावीत असे आवाहन डॉ. राठोड यांनी केले. या शिबिरात योग गुरु श्रुतीकांत ठाकूर हे योगासनाचे धडे देत आहेत. याचा जास्तीत जास्त डॉक्टरांनी लाभ घ्यावा असे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अशोक आरदवाड यांनी केले आहे.