Breaking News

67 गावे व 7 वाड्यांना 322 टँकर्सने पाणी पुरवठा 330 विहीरींचे अधिग्रहण

औरंगाबाद, दि. 11 - जिल्ह्यात 267 गावांत व 7 वाड्यांमध्ये 322 टँकर्सद्वारा पिण्याचे पाणी आजघडीला लोकांना पुरविले जात असून 280 गावांत 330 खाजगी  विहीरींचे पिण्याच्या पाण्यासाठी अधिग्रहण करण्यात आले आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी विश्‍वंभर गावंडे यांनी दिली.
सर्वाधिक टँकर्स गंगापूर तालुक्यात आहेत. तेथे 84 गावांत 98 टँकर्स आहेत. त्या खालोखाल वैजापूर 48(39), सिल्लोड 59(44), औरंगाबाद 32(18), कन्नड 24  (27), फुलंब्री 21 (15), पैठण 19 (17), सोयगाव 4 (4), खुलताबाद 17 (19) असे टँकर्स आहेत. कंसातील आकडा गावांचा आहे. जिल्ह्यात 322 टँकर्सच्या  688 फेर्या झाल्या आहेत. या 322 मध्ये 17 शासकीय टँकर्स आहेत. शासकीय टँकर्स एकूण 33 असून त्यातील 16 नादुरुस्त आहेत. तालुकानिहाय टँकर्समध्ये पाणी  भरण्याचे ठिकाणे निश्‍चित करण्यात आली आहेत.
पाणी टंचाई निवारण्यासाठी सन 2016-17 मध्ये 7962 लक्ष रुपये एवढा निधी प्राप्त आहे. त्यापैकी 1857 लक्ष रुपये एवढया रकमेची उपयोगिता प्रमाणपत्रे सादर  करण्यात आली तर 6105 लक्ष एवढी उपयोगिता प्रमाणपत्रे प्रलंबित आहेत. संभाव्य पाणी टंचाई निवारणार्थ उपययोजना कृती आराखडा ऑक्टोबर 2016 ते जून  2017 असा तयार असून एप्रिल 2017 ते जून 2017 या कालावधीसाठी 826 योजना, 291 गावे व 17 वाड्यांचा त्यात समावेश असून त्यासाठी 1926 लक्ष खर्च  प्रस्तावीत आहे. ऑक्टोबर 2016 ते आतापर्यंत 675 उपाययोजनांवर 589 गावे व 7 वाड्यांसाठी 508 लक्ष 10 हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत.