प्रसंगी आरक्षणासाठी विधानभवनाला घेराव घालणार : अण्णा डांगे
जळगाव, दि. 30 - धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा समाजातील खासदार यांनी पंतप्रधानांकडे मांडला होता. मात्र त्यांना खडसाविण्यात आले होते. तर दुसरीकडे आदीवासी समाजातील 50 खासदारांनी पंतप्रधानांची भेट घेऊन धनगरांना आरक्षण न देण्याबाबत भूमिका घेतली होती. त्यामुळे केंद्राकडून या आरक्षणाला विरोध झाला असल्याचे आरोप अण्णा डांगे यांनी केला.
पुण्योक अहिल्यादेवी होळकर जयंती व सामाजिक मेळाव्याचे आयोजन आज दि.28 रोजी कांताई सभागृहात करण्यात आले होते. त्यानंतर पत्रकार परिषदेत अण्णा डांगे यांच्यासह अध्यक्ष रामहरी रूपनवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता यावेळी ते म्हणाले की,धनगर आरक्षणासाठी महासंघाच्या माध्यमातून येत्या 15 जूनपर्यंत राज्यभरात समाजाचे मेळावे घेऊन जागरण मोहीम राबवून आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे.
सरकार स्थापन झाल्यावर पहिल्याच बैठकीत आरक्षणाचा मुद्दा सोडविण्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी टाटा संशोधनकडे हे काम दिले आहे. आरक्षण देऊ असा शब्द ते देतात; पण काही करत नाहीत. त्यांच्या करनी व कथनीत फरक आहे. मुख्यमंत्र्यांसारखा लबाड आपण पाहीला नाही,असे आ.रामहरी रूपनवार यांनी सांगितले.जळगाव : धनगर समाजाला घटनेने आरक्षण दिले आहे. मात्र सरकार आता आरक्षण देण्यास वेळकाढूपणा करीत आहे. मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच आठवड्यात आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. पण आता मागणी पूर्ण करण्यास फाटा देत आहे; त्यामुळे 61 वर्षांपासून समाज आरक्षणापासून वंचीत आहे. यासाठी आम्ही येत्या अधिवेशनाला समाजाच्या लाखो जनसुमदायासह विधानभवनाला घेराव घालणार आहोत. त्यानंतर हा लढा तीव्र करून दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावर आंदोलन करणार असल्याचे महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री अण्णा डांगे यांनी पत्रपरिषदेत सांगितले.