काश्मीरबाबत मोदी सरकारला धोरणच नाही- सिब्बल
नवी दिल्ली, दि. 07 - राष्ट्रीय सुरक्षा, काश्मीर खोरेस्तानबाबत सरकारचे कोणतेच धोरण नसल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी व्यक्त केले. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पाकिस्तानी घुसखोर सीमा पार करण्याची हिंमत करणार नाहीत, असे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी म्हटले होते. मग आता पाकिस्तानी हे धाडस कसे दाखवत आहेत, असा प्रश्न सिब्बल यांनी विचारला.
प्रेम पत्र पाठवत असल्याचा आरोप करणारे पाकिस्तानी आता प्रेमाचे ट्विट पाठवत आहेत. दहशतवाद व चर्चा एकाच वेळी होऊ शकत नाही. मात्र दहशतवाद व वाढदिवसाचा केक एकावेळी चालू शकतात. हे कसे काय शक्य आहे, हे केवळ तेच सांगू शकतात, असे सिब्बल यांनी माध्यमांना उद्देशून म्हटले. काश्मीर खो-यातील स्थिती दिवसेंदिवस वाईट होत आहे आणि विद्यार्थी रस्त्यावर उतरून दगडफेक करत आहेत ही अत्यंत गंभीर बाब आहे, असेही सिब्बल म्हणाले. यातून देशासमोर मोठे आव्हान निर्माण होत आहे. युवकांकडून कोणत्याही नेत्याशिवाय देशविरोधी मोहिम सुरू आहे. सरकारने यावर विचार केला पाहिजे. काश्मीरमधील आजचे वातावरण हे शांततेच्या दृष्टीने खूप दूर आहे, असेही सिब्बल म्हणाले.