उत्तराखंडमध्ये टेम्पो ट्रॅव्हलर दरीत कोसळून महाराष्ट्रातील 4 जणांचा मृत्यू
नवी दिल्ली, दि. 07 - उत्तराखंडमध्ये टेम्पो ट्रॅव्हलर दरीत कोसळून झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. तर सहाजण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महाराष्ट्रामधील अमरावती येथील चार जणांचा समावेश आहे. अपघातग्रस्त टेम्व्हलर यमुनेत्रीहून केदारनाथला जाताना असताना हा अपघात झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. चंद्रकांत सीताराम कारकर, कुंदादेवी चंद्रकांत कारकर, मीना सुधाकर मुरारी, संजय पाटील अशी मृतांची नावे आहेत. तर सतीश राऊत, अर्चनादेवी राऊत, आर्या राऊत,पौर्णिमा वैभव, सुधाकर राऊत हे सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
