भाजपा जिल्हाध्यक्षाना प्रदेश कार्यालयाकडून गाडी भेट
अहमदनगर, दि. 05 - भाजपा जिल्हा अहमदनगर यांना पक्षीय विस्तार व वाढीसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय वर्षानिमित्त प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांनी नवीन स्कॉर्पिओ गाडी भेट देण्यात आली. महाराष्ट्र भाजपा प्रदेश कार्यालयाने महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यांना पक्षाचे संघटन व बळकटीकरण करण्यासाठी गाडीचे भेट देण्यात आली.
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाने पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे होत आहे. यानिमित्त पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी दिलेल्या संदेशाप्रमाणे पक्षाची वाढ, पक्षाचा विस्तार करण्यासाठी आगामी 2019 चे लक्ष्य गाठण्यासाठी पक्षाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्ष यांना स्कॉर्पिओ गाडी भेट देण्यात आली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, अॅड.युवराज पोटे, विवेक नाईक, मुकुल गंधे, शत्रुघ्न पवार, श्यामराव पिंपळे, बापूसाहेब बाचकर आदि उपस्थित होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष बेरड म्हणाले, पक्षाचे संघटन व मजबुतीकरण, लक्ष्य 2019 गाठण्यासाठी तसेच पक्षाच्या केंद्रातील व राज्यातील विविध कल्याणकारी योजना समाजातील तळागाळातील घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी या गाडीच्या माध्यमातून दौरे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.