भारत-पाकचे अर्थमंत्री एकाच वेळी एका मंचावर, दोघांकडूनही संवादाचा प्रयत्न नाही
नवी दिल्ली, दि. 08 - एशियाज इकनॉमिक आउटलुक टॉकिंग ट्रेड या विषयावर आयोजित एका कार्यक्रमात अर्थमंत्री अरुण जेटली व पाकिस्तानचे अर्थमंत्री महोम्मद इशाक डार हे एका मंचावर एकत्र होते. मात्र त्यांच्यात कोणत्याही प्रकारचा संवाद किंवा हस्तांदोलन झाला नाही. जेटली यांनी यावेळी चीनच्या ‘वन बेल्ट-वन रोड’ धोरणाला पाकिस्तानच्या असलेल्या समर्थनाचा विरोध केला. पाकिस्तानी जवानांनी भारतीय जवानांच्या मृतदेहाचे विटंबन केल्याच्या पार्श्वभूमीवर भारत व पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी संवाद न साधणेच पसंत केले.
हा कार्यक्रम संपल्यावर जेटली यांनी शिष्ठाचार म्हणून छायाचित्रे काढून कार्यक्रम स्थळ सोडणे पसंत केले. या दोघांना भारत व पाक दरम्यानच्या तणावपूर्ण स्थितीबाबत, उभय देशामधील व्यापाराबाबत कोणताही प्रश्न विचारला गेला नाही. पत्रकारांनी जेटली यांच्याशी या विषयांवर बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी उत्तर देणे टाळले.