Breaking News

दिल्लीमध्ये बांधकाम सुरु असलेली इमारत कोसळली; मालकाला अटक

नवी दिल्ली, दि. 08 - दिल्लीमधील इंद्रपुरी परिसरात पाच मजली बांधकाम सुरु असलेली इमारत कोसळली आहे. या घटनेत अनेक जण जखमी झाले  असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी इमारतीच्या मालकाला अटक करण्यात आली आहे. घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ बचावकार्याला सुरूवात केली. या  इमारती जवळच्या सर्व इमारती रिकामी करण्यात आली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या इमारतीमधील नागरिकांना दोरीच्या साहाय्याने बाहेर  काढण्यात आले. इमारत का कोसळील यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र बांधकाम करताना वापरण्यात आलेली सामग्री हलक्या दर्जाची असल्याची  शक्यता वर्तवली जात आहे. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.