तलाठयांच्या ताब्यातून वाळूतस्करांनी पळवलेला ट्रक पोलिसांनी घेतला ताब्यात
संगमनेर, दि. 11 - संगमनेर तालुक्यातील साकूर येथील कामगार तलाठी राजू ताजणे हे वाळूचा ट्रक घारगाव पोलिस स्टेशनला घेवून येत असताना त्यांच्या ताब्यातून तिघा वाळूतस्करांनी ट्रक सोमवार दि. 8 मे रोजी दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास पळवून नेला होता. पण मंगळवार दि. 9 मे रोजी सकाळी पारनेर तालुक्यातील देसवडे याठिकाणी जावून घारगाव पोलिसांनी हा ट्रक पोलिस स्टेशनला आणला आहे. अवैधरित्या होणार्या वाळू उपशामुळे मुळा नदीची अक्षरश: चाळण झाली आहे. याकडे महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी का दुर्लक्ष करत आहेत असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, साकूर शिवारातील मुळा नदीपात्रात केटीवेअर्सच्या खालून दत्तात्रय गंगाराम दाते (रा. देसवडे, ता. पारनेर), संतोष शिवाजी घेवडे (रा. कोरेगाव, ता. जुन्नर, जि. पुणे), संदीप पंढरीनाथ गागरे (रा. देसवडे, ता. पारनेर) हे तिघे जण ट्रक क्रमांक एमएच 17 बीएच 4359 हिच्यामधून 12 हजार रुपये किंमतीची चार ब्रास वाळू घेवून येत होते. पण त्याच दरम्यान कामागर तलाठी राजू ताजणे यांनी हा ट्रक पकडला. तो घारगाव पोलिस ठाण्याकडे घेवून येत असतांना खंदरमाळ शिवारातील 19 मैल या ठिकाणी आले असता त्यावेळी वरील तिघांनी तलाठी यांच्या ताब्यातून हा ट्रक पळवून नेला होता. त्यामुळे ताजणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन घारगाव पोलिसांनी वरील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
घारगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप निघोट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल बन्सी टोपले, पोलिस कॉन्स्टेबल संतोष खैरे यांनी मंगळवारी सकाळी पारनेर तालुक्यातील पोखरी देसवडे याठिकाणी जावून हा ट्रक ताब्यात घेतला व तो घारगाव पोलिस ठाण्याच्या आवारात आणून लावला आहे. जांबूत, साकूर, मांडवे येथील मुळा नदीपात्रात राजरोसपणे अवैधरित्या वाळूउपसा चालू आहे.
वाळू तस्करांनी मुळा नदीपात्राचे पात्र बदलून टाकले आहे. वाळू उपशामुळे मुळा नदीची अक्षरश: चाळण झाली आहे. एवढया मोठया प्रमाणात अवैधरित्या वाळू उपसा चालू असताना देखील महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी याकडे का दुर्लक्ष करत आहेत.