जिद्द, चिकाटीने स्वप्न पुर्ण करता आले - साळुंके
अकोले, दि. 11 - जिद्द, चिकाटी व परिश्रमाच्या जोरावर कंपनीचा मालक बनण्याचे स्वप्न पुर्ण झाले असून कंपनीचा मोठा विस्तार करणे हे माझे ध्येय आहे असे प्रतिपादन मुळ औरंगाबाद येथील द्वारका इंडस्ट्रीजचे यशस्वी उद्योजक अनिल साळुंके यांनी केले.
अकोले येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस नुकतीच सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
दहावी नापास झाल्यानंतर टेक्निकल इन्स्टीटयुटमध्ये कोर्स पुर्ण केला. कंपनीमध्ये काम करताना पुढील शिक्षण घेतले व आपण स्वतःची कंपनी काढावी अशी इच्छा मनात आल्यानंतर एका लेथ मशीनच्या सहाय्याने सुरु केलेल्या व्यवसायाचे कंपनीत रुपांतर केले. यासाठी दिवसरात्र परिश्रम घेतले. आज कंपनीची वार्षिक उलाढाल 4 ते 5 कोटी रुपयाची आहे. आज आयटीआयला भेट दिल्यानंतर येथील संस्था चालक, प्राचार्य व त्यांच्या सहकार्यांचे योगदान मोलाचे असल्याचे समजले. या आयटीआयमधून उत्तीर्ण होणार्या नोकरीची संधी देवून त्यांनाही स्वतःच्या कंपनीचे मालक बनविण्यासाठी प्रयत्न करुन त्यांचा उत्कर्ष साधणार आहे. यावेळी अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी सदस्य आरिफ तांबोळी, प्राचार्य विद्याचंद्र सातपुते, गटनिदेशक लक्ष्मण नवले, निदेशक मच्छिंद्र गायकर, संदिप देशमुख, भरत साबळे व धामणगाव पाट विद्यालयाचे शिक्षक जालिंदर साळुंके, उमैर तांबोळी यांनी उद्योजक आनिल साळुंके यांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार केला.
यावेळी आरिफ तांबोळी यांनी साळुंके यांच्या कंपनीला भेट देण्याचे सुतोवाच करुन यांचा आदर्श प्रेरणा विद्यार्थ्यांना निश्चितच लाभदायक ठरतील, असे मनोगत व्यक्त केले. आभार लक्ष्मण नवले यांनी मानले.