राज्यात आवर्षण व गारपीठ होणार नाही याची सरकारने हमी द्यावी- ना. विखे
ना. दानवे यांच्या प्रस्तावाला विरोधी पक्षनेते यांचे उत्तर
संगमनेर, दि. 11 - राज्यातील शेतकर्यांचे कर्ज माफ केल्यास आत्महत्या करणार नाही, याची हमी द्या या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्याला उत्तर देत विरोधीपक्षनेते ना. राधाकृष्ण विखे यांनी चांगलाच समाचा घेतला. सरकारी पक्षाकडून प्रथम प्रस्ताव आणून राज्यात दुष्काळ पडणार नाही, आवर्षण येणार नाही व गारपीट होणार नाही याची हमी द्यावी, मग आम्ही आत्महत्या होणार नाही याची हमी देतो असे परखडमत त्यांनी व्यक्त केले.तालुक्यातील नांदूर खंदरमाळ येथील बिकानेर ढाब्याचे उद्घाटन प्रसंगी पत्रकारांशी बोलतांना ना. विखे पुढे म्हणाले की, खासदार रावसाहेब दानवे यांची किव करावेशी वाटते, स्वत:च्या जालना जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र वाढत असतांना त्याचा प्रथम अंर्तमुख होवून ना. दानवे यांनी विचार केला पाहिजे. तर कर्ज माफी केल्यास शेतकरी आत्महत्या करणार नाही याची हमी विरोधी पक्षाने द्रावी असा प्रस्ताव मांडला आहे. विरोधी पक्षाच्यावतीने आम्ही हमी देण्यास तयार आहोत असे सांगून विखे म्हणाले, दानवे यांना एवढेच सुचवायचे आहे की त्यांनी सरकारी पक्षाकडून प्रस्ताव मागावे की, राज्यात दुष्काळ पडणार नाही. आवर्षण होणार नाही, गारपीठ होणार नाही. शेतकर्यांचा सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे शेतकर्याच्या शेती मालाला आम्ही हमी भाव देवू, सरकारने याची हमी द्यावी. आम्ही कर्ज माफीनंतर शेतकरी आत्महत्या करणार नाही याची हमी द्यायला तयार आहोत असे सुतोवाच ना. विखे यांनी केले.
याप्रसंगी राधावल्लभ कासट, विशेसेनेचे तालुका प्रमुख जनार्दन आहेर, किशोर डोके, कैलास वाकचौरे, डॉ. अशोक इथापे, शिवाजी धुमाळ, चंद्रकांत घुले, तहसिलदार साहेबराव सोनवणे, तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले आदी मान्यवर उपस्थित होते.
