ग्रीन जीममुळे नागरिकांचे आरोग्य सुदृढ होण्यास मदत-सुनिता फुलसौंदर
अहमदनगर, दि. 10 - सध्या धावपळीच्या आणि फास्टफूडच्या जमान्यात मनुष्याचे आरोग्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यामुळे अनेक आजारांने मनुष्य त्रस्त होत आहे. त्यावर एकच उपाय म्हणजे नियमित व्यायाम होय. परंतु लांब किंवा व्यायाम शाळेत जावून व्यायाम करणे सर्वांनाच शक्य होत नाही. तेव्हा या भागात ग्रीन जीमची सोय परिसारात झाल्याने नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. नागरिकांनीही नियमित या जीमद्वारे सोपा व्यायाम करुन आपले आरोग्य सुदृढ होण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन नगरसेविका सुनिता फुलसौंदर यांनी केले.
प्रभाग क्र.30 फुलसौंदर मळा येथे बसविण्यात आलेल्या ग्रीन जीम साहित्याचे उद्घाटन नगरसेविका सौ.सुनिता फुलसौंदर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी माजी महापौर भगवान फुलसौंदर, एकनाथ नन्नवरे, अशोकराव शेळके, मोहन ठमके, पांडूरंग लगे, शिवा उबाळे, रमेश लकडे, श्रीराम खाडे, गोरख कांबळे, जनार्धन पवार, गणेश गायकवाड, अवधुत फुलसौंदर आदि उपस्थित होते.
यावेळी भगवान फुलसौंदर म्हणाले, गेल्या 20 वर्षापासून या परिसाराच्या मुलभूत सुविधा सोडविण्याबरोबर नागरिकांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी आरोग्य शिबीर, व्यायामशाळा आणि आता ग्रीन जीमची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. आपला प्रभाग हा सर्वच बाबतीत आदर्श करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास भास्करराव कांडेकर, अभिजित माडगे, हरिभाऊ चावंड, श्रीकांत गायके, ऋषी फुलसौंदर, यादव, लक्ष्मण आढाव, सविता साबळे, कविता साळूंके, विजय अमृते, सुमन कदम, प्रमिला राऊत, गिताबाई कदम, मोनाली वीर, आशा फुलसौंदर, वैशाली वीर आदिंसह परिसरात महिल व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.