गेणु गोडळकर यांचे समाज संघटनेचे मोठे कार्य
अहमदनगर, दि. 10 - गवळी समाजासाठी ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावले. तसेच त्यांनी सामाजासाठी विविध उपक्रम राबवून समाज संघटन करण्यासाठी महत्वपूर्ण प्रयत्न केले असे गेणू गोडळकर समाजातील ज्येष्ठ व्यक्तीमत्व आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच पुणे येथील सिदाजीअप्पा सामाजिक संस्थेच्यावतीने त्यांना समाजभुषण पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला. अशा या व्यक्तीचा शिवसेनेच्यावतीने सत्कार करुन त्यांच्या कार्याचा खर्या अर्थाने गौरव केला जात असल्याचे प्रतिपादन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केले.
गवळी समाजाचे कारभारी गेणु गोडळकर यांचा पुणे येथील समाजभुषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा शिवसेनेच्यावतीने उपनेते अनिल राठोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपशहरप्रमुख संतोष गेनप्पा, लंकेश हरबा, सटाप्पा गेनप्पा, लक्ष्मण खताळे, राम दहिंडे, भाऊसाहेब हुच्चे, पारुजी गोंधळे, दत्तू नागापुरे, सतीश नागापुरे, बुधाजी उन्हाळे, राहुल हरबा, विनोद बहिरवाडे आदि उपस्थित होते.
यावेळी बोलतांना उपशहरप्रमुख संतोष गेनप्पा म्हणाले, समाजात अनेक व्यक्ती समाज उन्नत्तीसाठी कार्य करत आहे. त्यांच्या कार्यास प्रोत्साहन देण्याचे काम समाजाच्या व शिवसेनेच्यावतीने नेहमीच केले जाते. गेणु गोडळकर हे गवळी समाजाचे आधारस्तंभ आहेत. त्यांना मिळालेल्या पुरस्कारबद्दल त्यांचे अभिनंदन !