Breaking News

न्या.कर्णन यांनी वैद्यकीय तपासणी करण्यास दिला नकार

नवी दिल्ली, दि. 05 - कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सी.एस.कर्णन यांनी वैद्यकीय तपासणी करण्यास नकार दिला आहे. माझी प्रकृती उत्तम आहे. तसेच मी मानसिकरित्या स्थिर असल्यामुळे मी कोणत्याही प्रकारची वैद्यकीय तपासणी करणार नाही, असे त्यांनी सांगितले. 
ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाबाबत माझा निर्णय ठाम आहे. वैद्यकीय तपासणी करण्यास भाग पाडणे म्हणजे हा माझा अपमान आहे. वैद्यकीय तपासणी करण्यासाठी कुटुंबियांची परवानगी घेणे गरजेचे असते. माझ्या कुटुंबातील कोणीच येथे नसते. त्यामुळे परवानगीचा प्रश्‍नच नाही. त्यामुळे कोणत्याच प्रकारची वैद्यकीय तपासणी होवू शकत नाही, असे त्यांनी सांगितले. तसेच माझी पत्नी आणि माझा मुलगा चेन्नईमध्ये असतात तर दुसरा मुलगा फ्रान्समध्ये असतो असे त्यांनी नमूद केले.