Breaking News

भुईकोट किल्ल्याच्या खंदक आणि तटबंदीचे सौंदर्य प्रतिकृतीमधून स्पष्ट होते

। माजी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांचे प्रतिपादन 

अहमदनगर, दि. 10 - पाचशे वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या अहमदनगरचा भुईकोट किल्ला जो कधीकाळी तोफगोळ्यांचा वर्षाव आणि खणखणाट करणार्या तलवारींचे द्वंद्व पाहिलेला बुरुज, त्यावर ऐटीत बसलेला गरुड, पोपटांचा थवा मोरांचा केकारव धनदाट हिरवाई यासर्व बाबी आपण प्रत्यक्ष बधितले नसले तरी शिल्पकार बालाजी वल्लाल यांनी तयार केेलेल्या भुईकोट किल्ल्याची, खंदक आणि तटबंदीचे सौंदर्य प्रतिकृतीच्या माध्यमातून स्पष्ट होते, असे प्रतिपादन अहमदनगरचे माजी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी केले.
अहमदनगरचे युवा शिल्पकार व इतिहसप्रेमी बालाजी वल्लाल यांनी भुईकोट किल्ल्याची संपूर्ण 22 बुरुजांची तटबंदी असलेली प्रतिकृती तयार केली आहे जे अहमदनगर किल्ला खुला झाल्यावर तेथे पाहण्यासाठी कायम स्वरुपी ठेवली जाणार आहे, ती पाहण्यासाठी अनिलजी कवडे यांनी बालाजी वल्लाल यांच्या निवासस्थानी त्या प्रतिकृतीची पाहणी केली हुबेहुब साकारण्यात आलेल्या या प्रतिकृती पाहून त्यांनी वल्लाल यांचे कौतुक केले.
यावेळी भुषण देशमुख,   भैरवनाथ वल्लाल, सपना वल्लाल, ठाकूरदास परदेशी, पंकज मेहेर आदि मान्यवर उपस्थित होते. अशा प्रकारच्या ऐतिहासिक स्थळाच्या मोठ्या प्रतिकृती तयार करुन शाळेच्या विद्यार्थ्यांना  त्याची  पाहणी    घडवून  आणने त्यांना त्यांची माहिती  देणे जेणे करुन नवीन पिढीमध्ये  ऐतिहासिक वास्तू बघण्याचा  व  इतिहासाशी   जवळीक साधण्यास मोठी  मदत  होईल, असे त्यांनी नमुद केले. ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी   नवीन  पिढीमध्ये त्याचे   आकर्षण निर्माण करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.