Breaking News

वीज पडून दोन ठार; किनगावात गारपीट

जळगाव, दि. 09 - चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसाने मेघगर्जना आणि विजेच्या हजेरी लावल्याने शेतमशागत करणार्या पिलखोड येथील मजुराचा डोण पिंप्री येथे तर खेडगाव येथील तरुणाच्या अंगावर वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला. तालुक्यातील खेडगाव येथील पितांबर हिरामण सूर्यवंशी (21) हा तरुण विहीर खोदण्याचे काम करण्यासाठी बहाळ शिवारात भटु सखाराम महाजन यांच्या शेतात गेला होता. दुपारी 4 वाजता अचानक ढग भरून आले, सुसाट वारा सुरु झाला; विहिरी शेजारी असलेल्या झाडाच्या आश्रयाला पितांबर गेला असता तेथे त्याचा घात झाला. त्या झाडावर वीज कोसळल्याने त्याखाली असलेल्या पितांबरचा जागीच भाजून कोळसा झाला.
पितांबरचे वडील पायाने अपंग आहेत. घरातील कर्ता पुरुष पितांबर होता. अचानक निसर्गाच्या अवकृपेने तो निघून गेल्याने या संपूर्ण परीसरात शोककळा पसरलेली आहे. मयताच्या निवासस्थानी जिल्हा परिषद सदस्य शशिकांत साळुंखे, उपसरपंच छोटू पाटील, माजी पोलीस पाटील रमाकांत साळुंखे,किनगाव, ता. यावल : यावल शहरासह परिसरात रविवारी वादळ वार्यासह पावसाने हजेरी लावली. दरम्यान किनगाव परिसरात गारपीट होत शेतकर्यांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या या वादळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती.