Breaking News

जळगाव जिल्ह्यात एरंडोल, पारोळा, यावल, भुसावळ येथे पाऊस

जळगाव, दि. 09 - जिल्ह्यात काल झालेल्या अवकाळी पावसामुळे वीज कोसळून दोन जण ठार झाल्याची घटना चाळीसगाव तालुक्यात घडली. दरम्यान किनगाव येथे जोरदार गारपीट झाली असून एरंडोल, पारोळा, यावल कासोदा, भडगाव, पाचोरा येथे पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे बाहेर टाकलेला मका पाण्यात भिजला असून कांद्याचे देखील नुकसान झाले आहे.